LOKSATTA PANCHAKARMA ARTICLES लोकसत्ता लेखमाला

विरेचन Virechana

विरेचन म्हणजे जुलाबाचे औषध घेऊन आतड्यातील दोष बाहेर काढून टाकणं

Image Description

विरेचनवमना नंतर विरेचन हे पंचकर्म येतेविरेचन हे पंचकर्मातील दुसरे कर्म आहे.विरेचन म्हणजे जुलाबाचे औषध घेऊन आतड्यातील दोष बाहेर काढून टाकणं

विरेचन काळस्वस्थ व्यक्तींना पावसाला संपून हिवाळा येई पर्यंत मधल्या काळामध्ये पित्ताचा प्रकोप होतो या काळात म्हणजेच शरद ऋतू मध्ये विरेचन करण्याचा योग्य काळ असतो. या शिवाय रोगानुसार वर्षभरात कधीही केले जाऊ शकते

विरेचन योग्य-उत्तम बल असलेला , तरुण, ,जीर्ण ज्वर, उदर, गुल्म, कावीळ प्लीहा रोग, विद्रधी, योनीरोग, कृमी, इत्यादी

विरेचन अयोग्य - क्षीण, गर्भिणी, मंद अग्नी, नव ज्वर, गुद भागी व्रण असता,

विरेचन पूर्व कर्मवमन प्रमाणेच विरेचनच्या पूर्वी पण स्नेहन स्वेदन व 3 ते 7 दिन स्नेह पान केले जातेस्नेह पान पूर्ण झाल्यावर 2 दिवस विश्रांती देऊन तिसऱ्या दिवशी विरेचानाचे औषध दिले जाते.

विरेचन कर्मआदल्या रात्री हलका आहार घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी’ ९ ते १० च्या दरम्यान रुग्णाला विरेचानाचे औषध दिले जाते.सर्व साधारण १२ नंतर रुग्णास जुलाब होऊ लागतात.१० ते १५ वेळा जुलाब होऊ शकतात.या काळा मध्ये फक्त कोमट पाणी प्यावे काही खाऊ नये अन्यथा उलटी होऊ शकते.सुरुवातीला मल नंतर पित्त व नंतर कफ दोष बाहेर पडतोजुलाबामुळे थकवा जाणवतो, हलकेपणा जाणवतो, वात सरतो,

पश्चात्करवमना प्रमाणे विरेचन झाल्यावर अग्नी मंद असतो त्यामुळे संसर्जन क्रम् केला जातोपहिल्या दिवशी भूक लागली असतादुपारी व रात्री भाताची पेज ( भातांच्या शीता शिवाय)दिली जाते.2 दुसऱ्या दिवशी भाताची पेज वा पातळ भात किंवा मुगाचे कढण खायला दिली जाते3 तिसऱ्या दिवशी मुगाचे सूप व पातळ भात तसेच साळीच्या लाह्या दिल्या जातात.या नंतर भुके प्रमाणे मुगाची खिचडी भात पोळी हे चवथा दिवशी दिले जाते.पिण्यासाठी कोमट पाणी दिले जाते.या उपक्रमामुळे अग्नी पुन्हा उत्तम होतो व पचन ठीक होते.

वैद्य प्रभाकर शेंड्येdrshendye@gmail.com